भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गुरु-शिष्य नात्याची गौरव करणारा दिवस : प्राचार्य डॉ.राजू फालक


भुसावळ (बुधवार, 29 जुलै 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक समिती अंतर्गत गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी मार्गदर्शन केले.

गुरु-शिष्य नात्याचा गौरव करणारा दिवस
आजचा दिवस भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र आणि प्रेरणादायी दिवसांपैकी एक आहे. हा दिवस आपल्या ज्ञानपरंपरेचा, संस्कारांचा आणि गुरु-शिष्य नात्याचा गौरव करणारा दिवस आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्यांनी वेदांचे संकलन, महाभारत आणि अठरा पुराणांची निर्मिती करून मानवजातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो, असे प्राचार्य म्हणाले.

भारतीय संस्कृतीने गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

या श्लोकाचा अर्थ केवळ धार्मिक नाही तर जीवनाला दिशा देणारा आहे. गुरु म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वातील अज्ञान, भीती, संभ्रम आणि न्यूनगंड दूर करून त्याच्यातील क्षमता जागृत करणारा शिल्पकार होय.

आज माहितीचा विस्फोट झालेला आहे. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (-ख) यांच्या माध्यमातून माहिती सहज उपलब्ध होते. परंतु माहिती आणि ज्ञान यात मोठा फरक आहे. माहिती आपल्याला उत्तर सांगते; परंतु योग्य विचार, विवेक, मूल्ये आणि निर्णयक्षमता गुरु घडवतात. म्हणून तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी गुरुचे स्थान कधीही कमी होणार नाही, असे प्राचार्य म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर समिती सदस्य प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.राजेश ढाके, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.गायत्री नेमाडे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.सुशीला भाटे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.सविता जंगले, प्रा.रंजना ढाके, प्रा.सागर सोनवणे, प्रा.अजय साळुंखे, प्रा.राजश्री ठोंबरे, भाग्येश वाघुळदे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !