भालोदला पालक सभेत सायबर सुरक्षेबाबत जनजागृती


यावल (गुरुवार, 30 जुलै 2026) : यावल तालुक्यातील भालोद गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विकहिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ या कार्यक्रमात सायबर फसवणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सायबरबाबत जनजागृती
भालोद, ता.यावल येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा’ अंतर्गत जननजागृती कार्यक्रम घेण्यात आला. गवातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित पालक सभेमध्ये सायबर सुरक्षा संदर्भात उपस्थित पालकांनी माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी आर.एस.जावळे होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक बी.एन. पाटील, जेष्ठ शिक्षक डी.एस.सुरवाडे, एम.एस.जाधव, एस.एम.तायडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी स्वयंसेवक टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी केले होते.

सायबर गुन्ह्यांविषयी पालकांना सविस्तर मार्गदर्शन
कार्यक्रमात डिजिटल युगात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांविषयी पालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. दैनंदिन जीवनात सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करता येते, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

सायबर सुरक्षित समाज घडविण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालये व समाजामध्ये सातत्याने जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सूत्रसंचालन पालक-शिक्षक संघ चिटणीस अर्चना इंगळे यांनी तर आभार डी.एस.आमोदकर यांनी मानले.

सोप्या भाषेत दिली माहिती
मोबाईलवर येणार्‍या संशयास्पद लिंक, ओटीपी फसवणूक, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्ड तयार करण्याची पद्धत, द्वि-स्तरीय प्रमाणीकरण, फोटो मॉर्फिंग, बनावट प्स, तसेच सायबर गुन्हा घडल्यास त्वरित तक्रार कशी करावी याबाबत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !