भुसावळात गोवंशाची अमानुष वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा


Inhumane transport of cattle in Bhusawal : Case registered against two individuals भुसावळ (शुक्रवार, 31 जुलै 2026) : भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर गोवंशाची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असताना बाजारपेठ पोलिसांनीकारवाई करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, 30 जुलै रोजी दुपारी सुमारे 3.15 वाजेच्या दरम्यान नाहाटा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर टाटा कंपनीच्या छोटा हत्ती (क्रमांक एम.एच.04 एच.वाय.3188) या वाहनातून तीन गोवंशीय जनावरे व दोन लहान वासरे अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी शेख अनिस शेख हनीफ (30, रा.ख्वाजानगर, सावदा, ता. रावेर) आणि साहील खान कलीम खान (22, रा.ख्वाजानगर, सावदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 68 हजार रुपये किंमतीची तीन गोवंशीय जनावरे व दोन वासरे तसेच सुमारे एक लाख रुपये किंमतीचे टाटा छोटा हत्ती वाहन मिळून एकूण एक लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !