गोंडगाव विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
भडगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : रा. स. शि. प्र, मंडळ संचलित भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळकांना पुण्यतिथीनिमित्त तर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

सुरुवातीस लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांच्हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे हे होते.
सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एस.डी.चौधरी यांनी केले. नन्नावरे यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन पटाबाबत तसेच कार्याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षक सी.एस.सोन्नीस, एस.डी.चौधरी, आर.एस.देवकर, व्ही.ए.पाटील, एस.आर.पाटील, एस.वाय.पाटील, पी.व्ही. सोळंके, बी.डी.बोरसे, ए. एम.साळुंखे, आर.एस.सैंदाणे, एस.आर.महाजन, लिपिक पी.जे.देशमुख, एस.जी.भोपे, ए.एम.परदेशी, एस.एल.मोरे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार एस.आर.महाजन यांनी मानले.