मध्य रेल्वे सीएसएमटी-दानापूर, मिरज-समस्तीपूर आणि भुसावळ-समस्तीपूर दरम्यान विशेष एकेरी गाड्या चालविणार


भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दानापूर, मिरज ते समस्तीपूर आणि भुसावळ ते समस्तीपुर दरम्यान विशेष एकेरी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दानापूर विशेष एकेरी गाडी
गाडी क्रमांक 01081 विशेष एकेरी गाडी 5 ऑगस्ट 2026 रोजी 12.30 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दानापूर येथे आठ वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर येथे थांबा असेल.

मिरज ते समस्तीपुर विशेष एकेरी गाडी
गाडी क्रमांक 01481 विशेष एकेरी गाडी दिनांक 04 ऑगस्ट 2026 रोजी मिरज येथून 10.20 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी समस्तीपुर येथे पाच वाजता पोहोचेल.

या गाडीला कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूरला थांबा देण्यात आला आहे.

भुसावळ ते समस्तीपुर विशेष एकेरी गाडी
गाडी क्रमांक 01183 विशेष एकेरी गाडी 5 ऑगस्ट 2026 रोजी भुसावळ येथून 1.40 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी समस्तीपुर येथे 18.30 वाजता पोहोचेल.

या गाडीला खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !