भुसावळातील ओमकार क्रीडा संघाला ‘सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ पुरस्कार


जळगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती यांच्या जयंतीनिमित्त कबड्डी महोत्सव व पुरस्कार सोहळा शनिवार, 1 ऑगस्ट 2026 रोजी झाला.

या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील मुलांच्या गटातून ‘सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ हा मानाचा पुरस्कार महाबली क्रीडा प्रसारक मंडळ संचलित भुसावळातील ओमकार क्रीडा संघाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार चंद्रकांत (अण्णा) सोनवणे (चोपडा) यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, शाम कोगटा, नितीन बर्डे, अ‍ॅड.रोहन बाहेती, बशीर बागवान, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते प्रदीप तळवलकर, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते नारायण अप्पा खडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पुरस्कार स्वीकारताना ओमकार क्रीडा संघाच्या वतीने यश चौधरी, सचिन चितोडिया आणि प्रदीप महाजन उपस्थित होते.

या पुरस्कारामुळे महाबली क्रीडा प्रसारक मंडळ व ओमकार क्रीडा संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि सातत्यपूर्ण क्रीडा योगदानाचा गौरव झाला. खेळाडू, प्रशिक्षक व सर्व पदाधिकार्‍यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !