सावद्यात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ‘बनाना सिटी चॅप्टर’चा दिमाखदार लाँचिंग व पदग्रहण सोहळा उत्साहात
सावदा, ता.रावेर (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यावसायीक नेटवर्किंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च ‘’सावदा बनाना सिटी सॅटेलाईट चॅप्टर’चा लाँचिंग आणि नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा पदग्रहण समारंभ शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सावदा येथील कुलसुमाबाई मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात झाला.

सोहळ्याला सावदा आणि परिसरातील उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.अजित मराठे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव-सावदा येथील भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे उपस्थित होते. व्ही. पी. कुलकर्णी, डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल पिंपळेकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
नव्या कार्यकारिणीचे व सदस्यांचे पदग्रहण
या सोहळ्यात सावदा बनाना सिटी चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीने व संस्थापक सदस्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत पदभार स्वीकारला. डॉ.अजित मराठे यांच्या हस्ते अॅड.अमोल रामचंद्र चौधरी यांनी चेअरमन म्हणून, अमोल पिंपळेकर यांच्याहस्ते गुणवंत नेमाडे यांनी सेक्रेटरी म्हणून तर व्ही.पी.कुलकर्णी यांच्याहस्ते ऋषिकेश सुनील पाटील यांनी ट्रेझरर (खजिनदार) म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी सावदा बनाना सिटी चॅप्टरच्या सर्व नवनियुक्त संस्थापक सदस्यांचे अधिकृत इन्स्टॉलेशन करण्यात आले. या चॅप्टरमध्ये खालील धडाडीच्या उद्योजकांचा सहभाग आहे: शेखर कासार, टेकचंद सरोदे,सागर प्रमोद पाटील,संतोष निमगडे, प्रतीक होले, सागर कोष्टी, ओमप्रकाश महाजन आदींची उपस्थिती होती.