कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी धावणार
भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : रेल्वे प्रशासनाद्वारे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोयंबतूर-जयपूर-कोयंबतूर दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 06181 साप्ताहिक विशेष गुरुवार, 13 ऑगस्ट 2026 ते 03 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्येक गुरुवारी कोयंबतूर येथून 02.30 वाजता सुटेल आणि जयपूर येथे शनिवारी 1.25 वाजता पोहोचणार आहे.


गाडी क्रमांक 06182 साप्ताहिक विशेष रविवार, 16 ऑगस्ट 2026 ते 06 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रत्येक रविवारी जयपूर येथून 10.05 वाजता सुटेल आणि कोयंबतूर येथे बुधवारी 8.30 वाजता पोहोचणार आहे.
या गाडीला तिरुपूर, इरोड, सेलम, जोलारपेट्टई, काटपाडी, रेणीगुंटा, कडपा, येर्रागुंटला, गुट्टी, धोने, कर्नूल सिटी, गडवाल, महबूबनगर, काचीगुडा, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, नंदुरबार, उधना, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, जावरा, मंदसौर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नसीराबाद, अजमेर आणि किशनगड येथे थांबा देण्यात आला आहे.
