भादली नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस 12 रोजी अमळनेरातून धावणार


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग अंतर्गत इगतपुरी-भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.

या कामामुळे यापूर्वी गाडी क्रमांक 19004 भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेस 12 ऑगस्ट 2026 रोजी रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता ही गाडी अमळनेर ते दादर व दादर ते अमळनेर दरम्यान धावणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.



गाडी क्रमांक 19003 दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस बुधवार, 12 रोजी दादर येथून सुटल्यानंतर अमळनेर स्थानकापर्यंतच धावणार आहे शिवाय ही गाडी भुसावळात येणार नाही.

गाडी क्रमांक 19004 भुसावळ-दादर खान्देश बुधवार, 12 रोजी भुसावळऐवजी अमळनेर स्थानकातून आपल्या नियोजित वेळेत सुटणार आहे. ही गाडी भुसावळ ते अमळनेर दरम्यान रद्द राहणार आहे.

रेल्वे प्रवाशांनी कृपया या बदलाची नोंद घ्यावी व त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !