भुसावळातील दादासाहेब भोळे महाविद्यायात नशाबंदी जनजागृतीसाठी सामंजस्य करार


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : वाढत्या व्यसनाधीनतेमुळे युवकांचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जीवन धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जाणिव निर्माण करण्याच्या उद्देशाने भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा जळगाव यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी भोळे महाविद्यालय, भुसावळ येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत दोन्ही संस्थांच्या मधे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला.

व्यसनमुक्ती विषयी जनजागृती
या कराराद्वारे व्यसनमुक्ती विषयी सातत्यपूर्ण जनजागृती, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून ज्ञान, संस्कार आणि सामाजिक मूल्ये जोपासणे आवश्यक आहे. व्यसनमुक्त तरुणाई हीच सशक्त राष्ट्रनिर्मितीची खरी ताकद आहे. शिक्षण संस्थांनी समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. . हा सामंजस्य करार ही केवळ औपचारिकता नसून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि सामाजिक बांधिलकी रुजवण्याचे प्रभावी माध्यम आहे.



अंमली पदार्थांपासून दूर राहणे काळाची गरज
या सभेत उपस्थित नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन राणे यांनी व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणार्‍या गंभीर परिणामांची उदाहरणांसह माहिती दिली. तंबाखू, मद्य आणि इतर अंमली पदार्थांपासून दूर राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहू आणि इतरांनाही व्यसनमुक्त करू हा संकल्प स्वीकारावा असे आवाहन केले.

विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येार
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती, रॅली, अमली पदार्थ सेवन विरोधी शपथ, तज्ञांची व्याख्याने, समुपदेशन, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य, आरोग्यविषयक अभियान तसेच राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग आणि आजीवन अध्ययन केंद्र यांच्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली बाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन सामाजिक परिवर्तनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
या उपक्रमासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन एस.राणे, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, विद्यार्थी विकास विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जगदीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामंजस्य करार सभेच्या नियोजन आणि आयोजनासाठी प्रा.एस.डी. चौधरी, प्रा.डॉ.ए.आर.सावळे यांच्यासह महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !