डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
जळगाव (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : रक्षाबंधन सणानिमित्ताने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय, जळगाव येथे आजपासून ‘भव्य आरोग्य संपदा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 30 ऑगस्टपर्यंत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
या आजारांवर होणार उपचार
शिबिरात डॉ. युवराज बढे (मधुमेह , हृदयरोग, फुप्फुस व किडनी विकार) आणि डॉ. रोशन राजपूत (मेडिसीन) यांच्या मार्गदर्शनाखाली ताप, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, किडनी व लिव्हरचे आजार, श्वसनाचे विकार, दमा, क्षयरोग (टीबी),तसेच इतर विविध आजारांवर तपासणी व उपचार केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार डायलिसिस, ब्राँकोस्कोपी, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी,2 डी इको कार्डिओग्राफी, ऑक्सिजन, नेब्युलायझेशन, आयसीयू, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखल होणार्या रुग्णांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा 24 तास उपलब्ध करून दिल्या आहेत.


शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
शासनाच्या योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांवरही शिबिरादरम्यान सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.तसेच शिबिरादरम्यान आवश्यक तपासण्या, ऑपरेशन्स व भरती होणार्या रुग्णांसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या असून, महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेणार्या रुग्णांनी आयुष्मान कार्ड सोबत आणावे. कार्ड नसल्यास मूळ रेशन कार्ड व आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. गरजू नागरिकांनी या आरोग्य संपदा शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
