भुसावळातील जय गणेश फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर

सचिववपदी प्रकाश चौधरींनी निवड ः सर्वसाधारण सभेत दोन वर्षांसाठी नूतन पदाधिकार्‍यांची निवड


भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जय गणेश फाऊंडेशनची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर, कार्याध्यक्षपदी तुषार झांबरे, उपाध्यक्षपदी राहुल भावसेकर यांची निवड करण्यात आली.

अन्य पदाधिकार्‍यांमध्ये सरचिटणीस निलेश कोलते, सचिव प्रकाश चौधरी, कोषाध्यक्ष ललित धांडे, युथ क्लब अध्यक्ष हर्षल जाधव, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष-विशाल आहुजा, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष- सुधीर देशपांडे यांची निवड करण्यात आली.




यांची विचार मंचावर उपस्थिती
संस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेच्या व्यासपीठावर फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर तसेच जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण वदडकर उपस्थित होते.

प्रास्ताविक समन्वयक गणेश फेगडे यांनी केले तर ज्येष्ठ नागरिक संघाचे नारायण वदडकर आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर शहरातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणार्‍या व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उमेश नेमाडे यांनी पुढील दोन वर्षांसाठी संस्थेच्या विविध शाखांच्या पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणा केली. सूत्रसंचालन उदय नेहेते व प्रा.डॉ.नरेंद्र महाले यांनी केले.

यांचा झाला सन्मान
सभेत अश्विनीकुमार परदेशी (उद्योग), राधाकृष्ण प्रभातफेरी (अध्यात्म), त्रिपदी परिवार (अखंड संगीत करुणा भजन), पत्रकार आनंदा पाटील (लेखन), व्ही.के.द्विवेदी (वृक्षारोपण व संवर्धन), आर.एस.तेली (समाजसेवा), डॉ.अभय कोटेचा (आरोग्यदूत), निलेश गोरे (हवामान अभ्यासक), राजेंद्र चोरडिया (दातृत्व प्रेरणा), स्नेहयात्री प्रतिष्ठान (वाचन संस्कृती), प्रकाश चौधरी (अध्यात्म सेवा), सागर विसपुते (रक्तदूत), महेंद्र महाजन (अध्यात्म), किरण कोल्हे (सेवाभाव)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !