भुसावळातील कोळी जमातीकडून विश्व आदिवासी दिन उत्साहात
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : भुसावळातील कोळी जमातीकडून 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांना पुष्पहार अर्पण करून तसेच पेढे वाटून साजरा करण्यात आला.
दीपक सोनवणे यांनी मनोगतात सांगितले की, दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आदिवासी कोळी जमातीचे हक्क, त्यांची संस्कृती, भाषा, परंपरा आणि जल-जंगल-जमीन यांचे जतन करण्याविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे हा दिवस साजरा करण्या मागचा मुख्य उद्देश आहे.




रविवार, 9 ऑगस्ट रोजी भुसावळ कोळी जमातीतर्फे आदिवासी दिनाचे औचित्य साधून जमात बंधू भगिनींना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच कडू प्लॉट येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी
आदिवासी वाल्मीक लव्य सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कोळी, जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सोनवणे, विशाल कोळी, राहुल कोळी, हरीश सोनवणे, गोटू कोळी, विजय कोळी, योगेश कोळी, राजू सोनवणे व समाजबांधव उपस्थित होते.