मुंबईसह मडगाव दरम्यान चार साप्ताहिक विशेष गाड्या धावणार
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : आठवड्या अखेरीस प्रवासाचे नियोजन करणार्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई – मडगाव दरम्यान चार विशेष गाड्या चालवणार आहे.
गाडी क्रमांक 01029 विशेष गाडी गुरुवार, 13 रोजी व शनिवार, 15 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 12.25 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी 3.15 वाजता पोहोचेल.




गाडी क्रमांक 01030 विशेष गाडी दिनांक गुरुवार, 13 रोजी व शनिवार, 15 रोजी मडगाव येथून चार वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसर्या दिवशी 3.45 वाजता पोहोचेल.
या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय असनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन असतील.