भुसावळात गर्भवती महिलांना पोषण आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने नगरपालिकेच्या दवाखान्यात गर्भवती महिलांसाठी जनजागृती व पोषण आहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गर्भवती महिलांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी स्तनपानाचे महत्त्व तसेच आई आणि बाळाच्या आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले. गर्भावस्थेत महिलांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच प्रसूतीनंतर नवजात बाळाची योग्य पद्धतीने कशी काळजी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.




या उपक्रमातून गर्भवती महिलांमध्ये योग्य पोषण, स्तनपानाचे महत्त्व आणि माता-बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली. महिलांना आरोग्यदायी आहार व प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतरच्या काळजीविषयी आवश्यक माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी योगिता वायकोळे होत्या. यावेळी सचिव कविता पाचपांडे, सदस्य प्रतीक्षा पाटील, नीता अहिराव, कविता हिरोडकर आणि रंजना यावलकर उपस्थित होत्या.