श्री क्षेत्र मांडकी येथे देवस्थानावर 12 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम


भडगाव (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मांडकी येथे श्री संत सदगुरु बाळुमामा यांच्या देवस्थानावर बुधवार, 12 रोजी रविवारी अमावस्यानिमित्त परंपरेप्रमाणे भंडार्‍यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भंडार्‍याचा होणार कार्यक्रम
यावेळी भट्टगाव येथील कै. लखीचंद जयसिंग परदेशी कै. मनुरबाई लखीचंद परदेशी यांच्या स्मरणार्थ विजय लखीचंद परदेशी, मिथुन विजय परदेशी या कुटुंबामार्फत अन्नदानाचा खर्च, सेवा करण्यात येणार आहे.





पहाटे पाच वाजता श्रींचे पाद्यपूजन व अभिषेक, सकाळी 7.30 वाजता अमावस्या आरती, सायंकाळी 7.30 वाजता अमावशा आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम श्री. संत सदगुरु बाळुमामा यांच्या मंदिरावर होईल.

या कार्यक्रमाचे आयोजन मांडकी येथील ग्रामस्थ, भाविक भक्त, पुजारी मंडळी तसेच मंदिराचे पुजारी सुभाष चौधरीमार्फत करण्यात आले आहे. दर्शन, महाप्रसादासह इतर कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !