जळगावात स्वातंत्र्य दिनी भारत माता पूजनासह विशेष कार्यक्रम
पूर्णवाद युवा फोरम व पूर्ण कन्या प्रतिष्ठानतर्फे आयोजन
जळगाव (मंगळवार, 11 मंगळवार 2026) : पूर्णवाद युवा फोरम व पूर्ण कन्या प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत मातेचे पूजन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी जयनगर येथील जीवन कला मंदिर येथे होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांनी होणार असून, यावेळी प्रा. नितीन महाजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यानंतर सकाळी 8.45 वाजता भारत मातेचे पूजन करण्यात येणार आहे.



कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महेंद्र धांडे (स्त्रीरोगतज्ज्ञ, जळगाव) उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय अभिमान आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने यावेळी 11 गरजू व्यक्तींना अन्नदान हा विशेष सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे.देशभक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणार्या या कार्यक्रमास गुरुबंधू-भगिनी तसेच जयनगर परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.