भुसावळातील हिंदी महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिवस
भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात बुधवार, 12 ऑगस्ट 2026 रोजी ग्रंथालयात एस.आर.रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्राचार्य डॉ.रमेश जोशी व ग्रंथपाल प्रमुख प्रा.हितेश गुप्ता यांच्याहस्ते श्री रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
पुस्तकांचे वाचन करा : हितेश गुप्ता
हितेश गुप्ता म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी ग्रंथालयात येऊन चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे. ग्रंथालयात दिल्या जाणार्या सेवा व सुविधा याविषयी माहिती सांगितली. रोजगार समाचार पत्र, वर्तमान पत्राचे वाचन करावे असे आपले मत व्यक्त केले. डॉ.रमेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना वाचन व लेखन यांचा दररोज सराव करावा जेणेकरून ज्ञानात भर पडते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नियमित वाचन विद्यार्थ्यांनी केलेच पाहिजे असे आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट दिलीच पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


