भुसावळातील कोटेचा महिला महाविद्यालयात डॉ.एस.आर.रंगनाथन जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथ दिन उत्साहात


भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात बुधवार, 12 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय ग्रंथालय दिवस साजरा करण्यात आला. डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.मीना चौधरी यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.

प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.हेमंत नारखेडे यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.मीना चौधरी यांनी ग्रंथालयाचे महत्व विषद केले.




कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी ग्रंथालय समितीचे डॉ.हेमंत नारखेडे, प्रा.धनश्री सोनवणे, प्रा.पवन बेलबागकर, ग्रंथालय कर्मचारी राठी यांनी परिश्रम घेतले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !