भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय एकता शपथ व जनजागृती रॅली


भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली तसेच जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

विद्यार्थिनींना एकात्मतेची शपथ
देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांबद्दल माहिती देण्यात आली व देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी त्यांच्या आठवणी सन्मानपूर्वक जपाव्या आणि आपलं काम इमानदारीने करावं, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतल देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन केले. या संपूर्ण कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.मीना चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.एस.खरे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे रासेयो अधिकारी व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !