भुसावळात द वर्ल्ड स्कूलमध्ये अलंकरण समारंभ उत्साहात


भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या द वर्ल्ड स्कूल, भुसावळ येथे अलंकरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना विकसीतकरण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून एपीआय राहुल तायडे उपस्थित होते. शाळेचे संचालक सीए रोहित एन.कोलते आणि मुख्याध्यापिका पेट्रीशा हैसेट यांची प्रमुख उपस्थिती होती.






विद्यार्थ्यांवर सोपविली नेतृत्वाची जबाबदारी
यावेळी लजेश महाजन यांची हेड बॉय, प्रिन्सी मनवानी यांची हेड गर्ल, ध्रुव तायडे यांची असीस्टंट हेड बॉय व माही मनवानी यांची असिस्टंट हेड गर्ल म्हणून निवड करण्यात आली.

विविध गटांच्या प्रीफेक्ट पदावर आभास मानेकर, दक्षिता वानखेडे, राज चौधरी, सत्यम सपकाळे, इन्सिया मोहवाला, सानिध्य श्रीवास्तव, शौर्या सपकाळे, उर्वी धानोकर आणि देवांशी काले यांची नियुक्ती करण्यात आली.

मुख्याध्यापिका पेट्रीशा हॅसेट यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा शिक्षक सुमित दासगुप्ता यांच्या सहकार्याने हा समारंभ यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकवृंद, समन्वयक, पर्यवेक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !