स्वातंत्र्य दिनानिमित्त भुसावळात जीएनआरएफतर्फे रक्तदान शिबिर
भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक सेवा क्षेत्रात सक्रिय असलेल्या गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (जीएनआरएफ), दावते इस्लामी इंडिया यांच्या वतीने भुसावळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुन्नी जामा मस्जिदजवळ, जाममोहल्ला, भुसावळ येथे होणार आहे.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जीएनआरएफच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान ठरू शकते.





पात्र व निरोगी नागरिकांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आयोजकांनी सांगितले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी 91561 11786 किंवा 70205 83371 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.