भुसावळ शहरात उद्या भव्य तिरंगा रॅली


भुसावळ (गुरुवार, 13 ऑगस्ट 2026) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रातर्फे शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मतदारसंघातील सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अष्टभूजा देवी मंदिरापासून रॅलीला सुरुवात
तिरंगा रॅलीला अष्टभूजा देवी मंदिराजवळून सुरुवात होणार आहे. या रॅली रॅलीचा समारोप शहीद राकेश शिंदे स्मारक – पी.ओ. नाहाटा कॉलेजजवळ होईल. रॅलीदरम्यान नागरिकांनी तिरंगा ध्वजासह सहभागी होऊन देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






‘एक तिरंगा, एक भारत, एक भावना’
‘एक तिरंगा, एक भारत, एक भावना’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी रॅली महत्त्वाची ठरणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !