भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात नशा मुक्ती अभियान व देशभक्ती गीत गायन स्पर्धा उत्साहात


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहरातील श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात नशामुक्ती अभियान ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ या उपक्रम कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘विकसीत भारत की ओर एक सशक्त कदम’ या संकल्पनेतून 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.मीना एस.चौधरी होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवून स्वतःच्या व देशाच्या प्रगतीत सकारात्मक भूमिका ठेवावी, असे आवाहन केले.





या कार्यक्रमात ज्योती दीदी व कविता दीदी आणि रितेश यांनी विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त भारत अभियान’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. व्यसनमुक्तीची शपथ विद्यार्थिनींकडून घेतली. त्यांनी ध्यानाचे प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थिनीं कडून करून घेतले.

यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश गुरूचळ, प्रा.रुकसाना शेख व इतर सदस्य, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन साक्षी कांबळे तर आभार प्रदर्शन प्रज्ञा जावळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !