भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात ‘व्यसनमुक्त राहण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प’


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमानिमित्त व्यसनमुक्ती शपथ आणि जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने महाविद्यालयास दिलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

व्यसनांपासून दूर राहण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन
महाविद्यालयाने या पूर्वीच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सोबत व्यसनमुक्ती साठी प्रचार, प्रसार प्रबोधन आणि प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार केलेला होता. त्याचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारची व्यसने, त्यांचे दुष्परिणाम तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे उपाय या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.





यांची होती उपस्थिती
प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे उपाध्यक्ष आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक अध्यक्षस्थानी होते. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक डॉ.दयाघन राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विद्यार्थी विकास विभागाचे मुख्य अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ.आर. पी.फालक यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांमुळे शिक्षण, कुटुंब, आरोग्य आणि सामाजिक जीवनावर होणार्‍या दुष्परिणामांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच सर्व प्रकारच्या व्यसनांना स्पष्टपणे नकार देऊन निरोगी व ध्येयवादी जीवनाचा स्वीकार करावा असे आवाहन केले.

भारत सरकारच्या 6 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित व्यसनमुक्ती शपथ पंधरवड्याचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी पुरवलेली शपथ पत्रानुसार प्रसंगी मंडळाचे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

शपथ ग्रहण झाल्यावर व्यसनांचे प्रकार, आरोग्यावर होणारे तसेच सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करणार्‍या व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टरचे विद्यार्थ्यांनी अवलोकन केले.

यांची होती उपस्थिती
प्रास्ताविक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.संजय चौधरी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी केले. प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ. अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.सागर सोनवणे, प्रा.अजय साळुंखे, प्रा.चेतन पारखे, भागेश वाघुळदे, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !