भुसावळातील म्युनिसीपल हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात


भुसावळ (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : नगरपरिषद संचलित म्युनिसीपल हायस्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला. महिला व बालकल्याण सभापती शोभा इंगळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी भाजप गटनेते युवराज लोणारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, माजी सभापती मीना लोणारी, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम नारखेडे, प्रा.आर.बी.इंगळे, वेद प्रकाश ओझा, राकेश चंदन, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.पी.सुलताने आणि सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका शिक्षक मंडळाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





विद्यार्थ्यांच्या कवायतीने वेधले लक्ष
ध्वजसंचालन डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महिला व बालकल्याण सभापती शोभा इंगळे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले तर शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक कैलास चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी पोह्यांची व्यवस्था केली तर रोनक भराडिया यांच्याकडून मोतीचूरचे लाडू देण्यात आले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एच.राठोड यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे रिक्षाचालक दादाराव पाटील यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !