गोंडगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात


गोंडगाव, ता.भडगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : रा. स. शि. प्र. मंडळ संचलित गोंडगाव येथील माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडाशिक्षक एस. डी. चौधरी यांनी ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.





स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतमातेच्या जयघोषात गावातून भव्य रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. रॅली गावातून मार्गक्रमण करत असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. देशभक्तीपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !