उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात


जळगाव (शनिवार, 15 ऑगस्ट 2026) : उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि महाविद्यालय आणि अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने खिर्डी शिवार येथील कृषि हब येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेश तायडे आणि अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी यांच्याहस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.





यावेळी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा पार पडला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !