साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा


भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : श्री स्वामिनारायण गुरुकुल, साकेगाव विद्यालयात विविध देशभक्तीपर उपक्रमांनी आणि उत्साह पूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे सचिव प्रमुख घनश्याम स्वामीजी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
परमपूज्य नयन प्रकाश शास्त्रीजी, डॉ.जे.के.भिरुड, शशिकांत कोल्हे, एकनाथ गुरुजी, पी.एस.लोखंडे, नीळकंठ महाजन, प्रमोद झांबरे, लता भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने सारा परिसर दुमदुमून गेला. यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,भाषणे, समूहगीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.





ही तर प्रत्येक नागरिकाची जवाबदारी
नयन प्रकाश शास्त्रीजी यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा इतिहास, देशाप्रती असलेली जबाबदारी, राष्ट्रीय एकात्मता आणि शिस्त यांचे महत्त्व सांगितले. स्वातंत्र्य ही केवळ गौरवाची गोष्ट नसून त्याचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी कॉपी मुक्त अभियान, तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शाळेचे संचालक गोपाळ भगतजी, मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका दीपाली वराडे यांनी केले. देश प्रथम, कर्तव्य प्रथम आणि राष्ट्रसेवा हीच खरी देशभक्तीया भावनेने संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !