रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व होमगार्ड पथकातर्फे भव्य रक्तदान शिबिर
रक्तदान शिबिरात 43 दात्यांचा सहभाग
Bhusawal Blood Donation Camp: 43 Donors Participate in Rotary Club and Home Guard Initiative भुसावळ (रविवार, 16 ऑगस्ट 2026): रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व होमगार्ड पथक, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय, भुसावळ येथील होमगार्ड कार्यालयात रक्तदान शिबिर झाले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर 43 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदान हे श्रेष्ठ दान
आपल्या एका रक्तदानातून अनेकांना जीवनदान या भावनेतून आयोजित या शिबिरात होमगार्ड पथकातील पुरुष व महिला कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यांनी घेतले परिश्रम
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समादेशक अधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, तालुका समादेशक अधिकारी सुरेश इंगळे, वरिष्ठ फलटण नायक विद्या लोखंडे, फलटण नायक रेखा सावळे, प्रज्ञा संत, अजय सुरवाडे, किरण राजपूत यांनी विशेष प्रयत्न केले. होमगार्ड पथकातील सर्व पुरुष व महिला कर्मचारी यांनीही शिबिराच्या आयोजनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे अध्यक्ष सुयश न्याती, सचिव डॉ.राहुल पांडे व प्रोजेक्ट चेअरमन डॉ.समीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले. रक्तसंकलनासाठी धन्वंतरी ब्लड बँक, भुसावळ यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ.प्रवीण महाजन यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
