किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा कर्मचार्याने फडकवला झेंडा
यावल (रविवार, 16 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायतीचे ध्वजरोहण गावातील पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश भगवान कोळी यांच्याहस्ते करण्यात आलेे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावातुन कौतुक होत आहे.
कर्मचार्यास ध्वजारोहणाचा मान
किनगाव खुर्द, ता.यावल येथील लोकनियुक्त सरपंच रुपाली दगडू कोळी व ग्रामसेवक सोनाली अरुण सोनवणे व ग्रामपंचायत उपसरपंच रियाज सुजतखा तडवी सह ग्रामपंचायत सदस्यांनी यंदाच्या स्वातंत्र दिनाचे ध्वजरोहण हे गावात कित्येक वर्षांपासून पाणीपुरवठा विभागात काम करणार्या कर्मचार्यास देण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश भगवान कोळी यांच्याहस्ते ध्वजरोहण करण्यात आले.
हा तर ग्रामपंचायत कर्मचारीवर्गाचा सन्मान
ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारीला मिळालेला हा सन्मान फक्त त्यांचा एकट्याचा नसून आम्हा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचा असून सर्व कर्मचारी वृंदाला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त या सोहळ्याची सांगता करत असताना सरपंच रुपाली दगडू कोळी यांनी यापुढेही असेच प्रेरणादायी उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली.
