यावल शहरात माजी गृहमंत्री स्व.जे. टी. महाजन जयंती साजरी
यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत व्यास शिक्षण मंडळ, यावलचे संस्थापक व राज्याचे माजी गृहमंत्री स्व. जे. टी. महाजन यांच्या 102 वी जयंती साजरी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्राचार्या रंजना महाजन अध्यक्षस्थानी होत्या. इंग्रजी माध्यमाच्या प्राचार्या दीपाली धांडे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. शाळेच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड, राजश्री लोखंडे यांनीदेखील उपस्थिती दिली. स्व. जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेला विनम्र अभिवादन केले. जयंतीनिमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धेचे व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन दीपाली जंगले यांनी केले. गायत्री चौधरी व लक्ष्मी कवडीवाले यांनी दादासाहेबांच्या जीवनपटावर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
शाळेच्या प्राचार्या दीपाली धांडे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना दादासाहेबांबद्दल माहिती सांगितली. आभार ऐश्वर्या पाटील यांनी मानले.
