जळगाव जिल्ह्यात प्रथम आलेल्या सानवी गडेचा यावल तहसील कार्यालयात गौरव


यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : यावल तहसील कार्यालयाच्या वतीने बाल संस्कार विद्या मंदिर शाळेची विद्यार्थिनी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत जळगाव जिल्ह्यात 85.23 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणार्‍या सानवी पंकज गडेचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावल तालुक्याचा वाढवला गौरव
सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून सानवीने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बाल संस्कार विद्या मंदिराच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही दखल घेतली गेली आहे. या सत्कार समारंभास यावल-रावेर तालुक्याचे विधानसभा आमदार अमोल जावळे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, माजी आमदार रमेश चौधरी, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे तसेच विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सानवीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या यशामागे मार्गदर्शन करणारे तिचे आई-वडील, मुख्याध्यापक शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन यांचेही कौतुक करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !