राजोरेतील क्रांती स्मृती सप्ताहाची उत्साहात सांगता
यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : यावल तालुक्यातील राजोरे जिल्हा परिषद शाळेत 9 ऑगस्टपासून सुरू असलेल्या क्रांती स्मृती सप्ताहाची 14 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी भाजपाचे अनू. जमाती सोशल मीडिया प्रमुख योगेश शंकोपाळ होते. प्रमुख पाहुणे राजोरे गावातील उपसरपंच दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, ग्रामसेवक सुरज सोनवणे, मयूर महाजन, विकास पाटील, हर्षल जावळे, हर्षल सोनवणे यांची उपस्थिती होती. प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र तसेच शैक्षणिक साहित्याचे ग्रामपंचायत राजोरेतर्फे वाटप करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी प्रसंगी क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक स्मरणाच्या बाबी नमूद केल्या तर योगेश शंकोपाळ यांनी शाळा परिसर तसेच लोकसहभागाचे कौतुक केले. दातृत्वातून सदर क्रांती स्मृती सप्ताहाची सांगता करण्यात आली. सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले. संजय काकडे, मोहित कोळी, भाग्यश्री महाजन, सरला जावळे आदींनी परिश्रम घेतले.
