भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये नशामुक्ती जनजागृती रॅली
भुसावळ (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : कोलते फाउंडेशन संचलित शहरातील द वर्ल्ड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी.हॅसेट यांच्याहस्ते झाला.
विद्यार्थ्यांनी व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार व नशामुक्त भारत, सशक्त भारत अशा घोषणांद्वारे जनजागृती केली. संदेश फलकांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रम शाळेच्या समन्वयक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
