युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील

कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ.कल्याणी नागूलकर ः भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा उपक्रम


जळगाव (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी शिवतीर्थ मैदान येथे युवतींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. दहिहंडी फोडणार्‍या युवतींच्या प्रथम विजेत्या संघाला 31111 रूपये, द्वितीय संघाला 21111 रूपये, तृतीय संघाला 11111 रूपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. युवतींच्या दहीहंडीचे यंदा 18 वे वर्ष असून दहिहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहींहंडी सुरू करण्यात आली आहे. मानवी मनोरे बनविणे या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी साजरी होत असते.

अशी आहे उत्सव समिती
दहीहंडी उत्सवाची समिती गठीत करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्षपदी उषा जैन, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिवपदी प्रा. क्षमा सराफ यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारीणी अशी
खजिनदार निलम जोशी, स्वागत समिती सदस्य रूपाली वाघ, सदस्य म्हणून डॉ. अनिता पाटील, हर्षाली चौधरी, नेहा जोशी, सोनाली पाटील, लेफ्टनंट डॉ. हेमाक्षी वानखेडे, संध्या कांकरिया, मिनल जैन यांची या असतील. युवतींची दहिहंडी उत्सव समितीच्या नविन कार्यकारिणीने ‘ठेवूया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ या टॅगलाईन चे पोस्टर अनावरण केले.

प्रेरणादायी उपक्रम
‘युवतींनी युवतींसाठी आयोजित केलेली दहिहंडी हा अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी उपक्रम आहे. महिलांनी पुढाकार घेऊन महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमामधून युवतींच्या आत्मविश्वाला बळ मिळते आणि समाजात महिला नेतृत्वाची नवी दिशा निर्माण होते, असे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !