फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू : अनिल जैन

जळगावातील जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा


जळगाव (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : ‘फोटोग्राफी म्हणजे केवळ क्षण टिपणे नव्हे तर हरवलेल्या आठवणी पुन्हा जिवंत करण्याची जादू व ताकद आहे.’ असे प्रतिपादन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी जागतिक फोटोग्राफी दिनाच्या औचित्याने केले. जैन हिल्सच्या कांताई कार्यालयात त्यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. त्याच सोबत उपस्थित छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

भावनाही कॅमेर्‍यात टिपायला हवी
फोटोग्राफी हा चांगला व्यवसाय आहे. असे सांगत फोटो आणि व्हिडिओमुळे जगभरातील लोक एकमेकांशी जोडले गेले असून खर्‍या फोटोग्राफरने क्षणासोबतच त्यामागील भावनाही कॅमेर्‍यात टिपली पाहिजे असे सांगून या नकारात्मक जगात सकारात्मकता दाखविणारे फोटो मनाला आनंद देणारे ठरतात. गुगलवर हव्या त्या विषयाचे फोटो आपण शोधून मिळवू शकतो. आपल्या जैन हिल्स व जैन फूडपार्क येथे निसर्गाने नटलेला हा परिसर छायाचित्रांसाठी चांगला आहे. निसर्गाचे संदर्भ छायाचित्र कुणाला हवे असेल तर आपल्याकडे काढलेल्या छायाचित्राचा उपयोग व्हावा अशी कलात्मक नजर विकसीत करायला हवी असे देखील अनिल जैन यांनी कंपनीच्या छायाचित्रकारांना आवाहन केले.

भंवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भंवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, ती परंपरा आजही सुरू आहे. याप्रसंगी छायाचित्र विभागाचे राजेंद्र माळी, तुषार हरिमकर, योगेश संधानसिवे, समाधान महाजन, हिमांशू पटेल, अभंग जैन, विकास मल्हारा, मनिष शहा, अनिल जोशी, विजय जैन, शिवा तुपे, ज्ञानेश्वर शेंडे, आनंद पाटील, किशोर कुलकर्णी, देवेंद्र पाटील सुनील दांडगे, महेश दांडगे, प्रशांत शिंदे, मुरलीधर बडगुजर आदी सहकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !