कासोदा पोस्ट कार्यालयात डाक सहाय्यकाकडून लाखाचा अपहार : संशयीत भुसावळातील रहिवासी


कासोदा (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : एरंडोल तालुक्यातील कासोदा उपडाक घरात सहाय्क म्हणून सेवेत असलेल्या मोहन मधुकर सपकाळे (40, खडका चौफुली, भुसावळ, ह.मु.कालिका माता मंदिर, जळगाव) यांनी एक लाखांचा अपहार केला. या प्रकरणी सहाय्यक डाक अधीक्षक शीतल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे अपहार प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन मधुकर सपकाळे (40) हे 27 जुलै 2023 ते 23 जुलै 2024 या कालावधीत कासोदा (ता. एरंडोल) येथील उपडाकघरात डाक सहाय्यक पदावर नियुक्त होते. या कालावधीत उपडाकघरातील खजिनदार शामकांत आर. सोनवणे यांच्याकडून सपकाळे यांनी एक लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारले मात्र सदर रक्कम उपडाकघराच्या शासकीय हिशोबात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शासकीय रकमेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून शासनाची फसवणूक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी सहाय्यक डाक अधीक्षक शीतल शामराव म्हस्के (50) यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत अंकुश पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !