जळगावातील पान सेंटरवर गुटख्याचा साठा जप्त


जळगाव (शनिवार, 22 ऑगस्ट 2026) : जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील राज पान सेंटरवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पानमसल्यासह एक हजार 791 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अल्ताफ अकबर पटेल (वय 26, रा. मेहरूण आझाद नगर, जळगाव) याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
जळगावच्या नवीन बसस्थानक परिसरातील राज पान सेंटरमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री व साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिग्नेचर पान मसाला, रंजनीगंधा पान मसाला, करमचंद पान मसाला, राजश्री पान मसाला, -चऊ पान मसाला, राजनिवास पान मसाला, विमल पान मसाला, विमल तंबाखू, च् गोल्ड तंबाखू तसेच इतर पानमसाला असा एकूण एक हजार 791 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहेत. ही कारवाई जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे एपीआय अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !