काठमांडू (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पुरानंतर आतापर्यंत 360 हून अधिक मृतदेह सापडले असून सूत्रानुसार 288 भारतीयांसह 1500 नागरिक बेपत्ता झाले आहे. बेपत्ता नागरिकांचा प्रशासनाकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

पुराच्या पार्श्वभूमीवर, चीनने भोटेकोशी नदीत पुन्हा एकदा मोठ्या पुराचा इशारा दिला आहे. चीनकडून मिळालेल्या माहितीनुसार, रसुवागढी सीमेपासून सुमारे 18 किलोमीटर वरच्या बाजूस ल्हेंडे नदीत पाणी साचल्यामुळे एक तलाव तयार झाला आहे. प्रशासनाने सखल भागातील लोकांना नदीकिनारीून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे. जर हा तलाव फुटला, तर भोटेकोशी नदीला पुन्हा एकदा भीषण पूर येऊ शकतो.



गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या नेपाळ पोलिसांच्या आकडेवारीनुसार, बुधवारच्या पुरात 360 लोकांचा मृत्यू झाला आहे. आठ जिल्ह्यांमधून मृतदेह सापडले असून सर्वाधिक 132 मृतदेह चितवन जिल्ह्यात आढळले आहेत.

पुरामुळे सुमारे 1,500 लोक बेपत्ता असून, त्यात 288 भारतीयांचा समावेश आहे. 21 भारतीयांना वाचवण्यात आले असून, त्यापैकी 11 जणांची ओळख पटली आहे.

पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसानंतर, लंडनमधील नेपाळी समाज मदतीसाठी पुढे आला आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्लमस्टेड येथील श्री पशुपतिनाथ मंदिरात एक देणगी पेटी ठेवण्यात आली आहे.

मंदिराचे पुजारी नील हरी ग्रिमियर यांनी सुरू केलेल्या या पेटीत भाविक स्वेच्छेने पैसे दान करत आहेत. ही देणगी नेपाळमधील आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिली जाईल.

दरम्यान, पुरात वाहून आलेल्या मृतदेहाच्या कानातून कर्णभूषण काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चौकशी आणि तपासासाठी दोन्ही आरोपींना चितवन येथील जिल्हा पोलीस कार्यालयात पाठवण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !