मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी शिवाजी सुतार


भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून मंगळवारी शिवाजी सुतार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सुनील उदासी यांच्याकडून पदभार स्वीकारला. उदासी यांची मुंबई रेल्वे विकास महामंडळात प्रतिनियुक्ति करण्यात आली आहे. सुतार हे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस) वर्ष 2008 बॅचचे अधिकारी आहेत.

उपनगरीय परीचालनाचा सखोल अनुभव
शिवाजी सुता यापूर्वी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात वरीष्ठ विभागीय परीचालन व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये विशाखापट्टनम स्टील प्लांट येथे एरिया मॅनेजर, वॉल्टेयर विभागात विभागीय वाहतूक व्यवस्थापक, पारादीप पोर्टचे एरीया मॅनेजर या सारख्या विभिन्न पदांवर काम केले आहे. त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, विभागीय पीचालन व्यवस्थापक म्हणूनही कार्य केले आहे. सुतार यांना उपनगरीय परीचालनाचा सखोल अनुभव आहे. शिवाजी सुतार यांना रेल्वेतील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2017 मध्ये मध्य रेल्वे महाव्यवस्थापक पुरस्कार आणि वर्ष 2018 मध्ये रेल्वे मंत्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे सेवा, मेल / एक्सप्रेस गाड्यांच्या संचलनात सुधारणा करण्यासाठी सक्रीय योगदान दिले आहे. त्यांनी उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.


कॉपी करू नका.