भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

रेल्वे हद्दीतील विकास कामे, अतिक्रमण व पुनर्वसनाबाबत बैठकीत विशेष आढावा


जळगाव (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, वाहतूक नियमन, रस्त्यावरील सुरक्षा व्यवस्था तसेच शहरातील विविध समस्यांबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, भुसावळ विभागीय रेल्वे सह व्यवस्थापक राजेंद्र देशपांडे, भुसावळ नगरपरिषद अध्यक्षा शैलजा नारखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, नगरपरिषद विविध विभागांचे सभापती, नगरसेवक, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार लीना नवाडे, मुख्याधिकारी विवेक धांडे तसेच पोलीस, परिवहन, महामार्ग व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


अपघात स्पॉटची पाहणी करा
मंत्री श्री सावकारे म्हणाले, भुसावळ-वरणगाव महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना मंत्री संजय सावकारे यांनी पोलीस, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. वाहतूक नियमन अधिक प्रभावी करणे, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, दिशादर्शक व सुरक्षाविषयक फलक लावणे तसेच रस्त्यावरील इतर अडचणी दूर करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

विकासकामांचा आढावा
रेल्वे हद्दीतील विकास कामे, अतिक्रमण व पुनर्वसनाबाबत मंत्री सावकारे यांनी घेतला आढावा. भुसावळ शहरातील रस्ते, वाहतूक व्यवस्था, रेल्वे हद्दीतील जागा, नागरी सुविधा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छतेशी संबंधित विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा सूचना मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना दिल्या. बसस्थानक ते वरणगाव रोड जोडणार्‍या मार्गाचा विकास, वरणगाव रोडचे रुंदीकरण, बाजारपेठ ते अमर स्टोअर्स मार्गाचे रुंदीकरण, बस डेपो मार्गावरील वाहतूक नियोजन तसेच नवीन रस्त्यांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कचरा डम्पिंगचे ब्लॅक स्पॉट हटवा
रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून रस्ते विकासासाठी आवश्यक जागेची परवानगी व ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने मिळवावे, तसेच थकीत सर्व्हिस चार्जेस व अग्निशमन सेवांच्या शुल्काबाबत रेल्वेकडे अधिकृत मागणी नोंदवावी, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले. शहरातील कचरा डम्पिंगचे ब्लॅक स्पॉट हटविणे, नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्षा थांब्यांचे नियोजन आणि बसस्थानकाच्या स्वच्छता व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री सावकारे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !