जळगाव जिल्ह्यात 17 सप्टेंबर व 6 जानेवारी 2027 रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत
वरणगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर संमती व तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम महसूल लोक अदालत 17 सप्टेंबर 2026 आणि द्वितीय महसूल लोक अदालत 6 जानेवारी 2027 रोजी महसूल लोक अदालती आयोजित करण्यात येणार आहेत.
या अधिकार्यांचा असेल सहभाग
या अभियानात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांच्या स्तरावरील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या स्तरावरील प्रकरणांचाही समावेश राहणार आहे.


