अट्रावल येथील सागर तायडे वर्षभरासाठी हद्दपार : मध्यप्रदेशातील हद्दीत सोडले

फैजपूर प्रांताधिकार्‍यांच्या आदेशानंतर यावल पोलिसांची कारवाई


यावल (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील अट्रावल गावातील सागर अनिल तायडे यास जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. याबाबतचे आदेश फैजपूर प्रांताधिकार्‍यांनी काढल्यानंतर यावल पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी करीत तायडे यास बर्‍हाणपूर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडले.

फैजपूर प्रांताधिकार्‍यांचे आदेश
अट्रावलद्व ता.यावल येथील रहिवासी सागर अनिल तायडे (38) याच्याविरूध्द यावल पोलिसात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत तर एका गुन्ह्यात तो खुप दिवसांपासुन पोलिसांना हवा होता व त्याने या गुन्ह्यात नुकता अटकपूर्व जामीन मिळवला. यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 56 अंतर्गत तायडे यास हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव प्रांताधिकारी फैजपूर यांच्याकडे सादर केल्यानंतर तायडे यास एक वर्षांसाठी हद्दपार केले. तायडे यास बर्‍हाणपूरच्या राजनगर परिसरातील राकेश शिरतुरे यांच्याकडे जाणार असल्याचे सांगितल्याने गुरुवारी हवालदार वासुदेव मराठे यांनी आदेशाची प्रत देत त्यास सहा.पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार उमेश महाजन, सागर कोळी, सचिन पाटील यांनी मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याला सोडले व त्यास पोलिसात हजेरी देण्याच्या सुचना केल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !