सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द : कारण समोर आले हे कारण
भुसावळ (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत चक्रधरपूर विभागातील बागडिही स्थानक येथे यार्ड रिमॉडेलिंग तसेच बागडिही-झारसुगुडा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या कमिशनिंगचे काम करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा कामाच्या अनुषंगाने काही गाड्यांच्या परिचालनावर परिणाम होणार असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 13425 मालदा टाउन-सुरत एक्सप्रेस 31 ऑक्टोबर 2026 रोजी मालदा टाउन येथून रद्द करण्यात आली आहे तर गाडी क्रमांक 13426 सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस 2 नोव्हेंबर 2026 रोजी सुरत येथून रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे तसेच प्रवासापूर्वी गाडीच्या वेळापत्रकाची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


