साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलच्या प्रांगणात गोविंदाच्या जयघोषात रंगली दहीहंडी
भुसावळ (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : श्री स्वामिनारायण गुरुकुल, साकेगाव विद्यालयात शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पारंपारिक उत्साह व भक्ती भावाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.. या उत्सवाने शाळेचे प्रांगण गोविंदा… गोविंदाच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे, मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संचालक गोपाळ भगतजी यांच्याहस्ते दहीहंडी पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम मैत्री, एकता आणि आनंदाचा संदेश देत हा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

