डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहात


जळगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालय, जळगाव. महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाला व दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणात यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके यांनी श्रीकृष्ण पूजनाने आणि आरतीने केली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व मानवी मनोरे गोपाळकाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.


मुलींच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी ’गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे रचून अनुराधा सुरडकर इने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.सांस्कृतिक उपक्रम व पारंपरिक वेशभूषा या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोषाख परिधान केला होता. महाविद्यालयात खालील विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक रूपात सहभाग नोंदवला, भजन व संगीत सादरीकरण: विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण भक्तीवर आधारित गाणी व भजने सादर केली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्यांसोबतच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने या उत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शिवानी महाजन यांनी केले.

गोदावरी आयएमआर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा!
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच गोपाळकाला व दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणात यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी श्रीकृष्ण पूजनाने आणि आरतीने केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व मानवी मनोरे गोपाळकाल्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मुला-मुलींच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी ’गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे रचून अनिकेत चौधरी याने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.सांस्कृतिक उपक्रम व पारंपरिक वेशभूषा या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोषाख परिधान केला होता. महाविद्यालयात खालील विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक रूपात सहभाग नोंदवला, भजन व संगीत सादरीकरण: विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण भक्तीवर आधारित गाणी व भजने सादर केली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्यांसोबतच सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने या उत्सवाचे नियोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !