खेडी खुर्द जिल्हा परिषद शाळेत मोफत रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

124 विद्यार्थ्यांची झाली तपासणी : विद्यार्थ्यांना आहाराबाबत मार्गदर्शन


जळगाव (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : अनामिका प्रतिष्ठान, जळगाव आणि माधव गोळवलकर रक्तपेढी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा क्र. 1, खेडी खुर्द (ता. जळगाव) येथे मोफत रक्तगट व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल 124 विद्यार्थ्यांची रक्तगट आणि हिमोग्लोबिन (कल) तपासणी करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यकिरण वाघण्णा यांनी ज्या विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन कमी आढळले, त्यांच्या आहाराबाबत आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


तपासणी उपक्रमात शाळा व्यवस्थापन व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शितल चौधरी, राणी काळे, सुनंदा कोळी, देविदास पाटील, तर माधव गोळवलकर रक्तपेढी तर्फे रामचंद्र पोद्दार व जागृती लोहार यांनी सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी केली .

या सामाजिक उपक्रमाच्या प्रसंगी अनामिका प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन नेवे, सचिव प्रमोद माळी, माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे विद्यमान संचालक डॉ.सूर्यकिरण वाघण्णा, अ‍ॅड.संजय सपकाळे यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षकवृंद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेबद्दल शाळा प्रशासनाने आयोजकांचे आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !