भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त जल्लोष


भुसावळ (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका सीएस रचना आर.कोलते व मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी.हॅसेट उपस्थित होत्या. नर्सरी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सहभाग घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दहीहंडी उत्सवात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.


यावेळी भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील प्रेम, मैत्री व सदाचार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मुख्याध्यापिका पेट्रीशिया सी.हॅसेट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. शिक्षक व कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे उत्सव संस्मरणीय ठरला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !