अमळनेर कृउबात सीसीआय केंद्राला मंजुरी : कापूस उत्पादक शेतकर्यांना नोंदणीचे आवाहन
अमळनेर (शनिवार, 5 सप्टेंबर 2026) : कृषी उत्पन्न बाजार समितीला सीसीआय केंद्र आधीच मंजूर झाले असून भारतीय कापूस महामंडळातर्फे कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी 1 सप्टेंबरपासून तर 31 ऑक्टोबर पर्यंत नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
आधारभूत किंमतीत होणार कापसाची खरेदी
कापूस महामंडळातर्फे किमान आधारभूत किंमत अंतर्गत कापूस खरेदी करण्यात येणार आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकर्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी आधार कार्ड, कापूस पिकपेरा लावलेला सातबारा, फार्मर आय डी, बँक पासबुक आदींचे झेरॉक्स सोबत आणावा तसेच बाजार समितीत त्यांची नोंदणी मोफत करण्यात येईल, असे आवाहन सभापती अशोक पाटील, सचिव डॉ.उन्मेष राठोड यांनी केले आहे.


